व्यवसाय संघटना ,व्यवसाय संघटना प्रकार - Business organization, business organization typeBusiness organization: व्यवसाय संघटना कोणत्याही प्रकारची असली तरी समाजाला वस्तू व सेवांचा पुरवठा करणे हा त्यांच्या कार्यामागील मुख्य हेतू असतो. व्यापारी संघटना म्हणजे अशी रचना की, जी औद्योगिक किंवा व्यापारी कार्य करील आणि वस्तूंचे उत्पादन व पुरवठा यांच्या माध्यमातून फायदा मिळवेल. व्यवसाय क्षेत्रात कार्य करीत असलेल्या या विविध व्यावसायिक संघटना एकदम निर्माण झाल्या नाहीत तर व्यापाराच्या विकासाच्या अवस्थांतून एकापाठोपाठ एक अशी त्यांची गरजेनुसार निर्मिती झाली

. सुरुवातीस ‘एकल व्यापारी’ संस्था निर्माण झाल्या, व्यवसाय वाढविण्यासाठी आणि भांडवल व व्यवस्थापकीय कौशल्ये या गरजा भागवण्यासाठी सामूहिक मालकी असणाऱ्या ‘भागीदारी संस्था’ अस्तित्वात आल्या. मोठ्या प्रमाणावर भांडवल उभे करून,व्यवसायामध्ये आधुनिक तंत्र व कौशल्याचा वापर करून,उत्पादन आणि सेवा कार्यामध्ये नफा मिळविण्यासाठी ‘संयुक्त भांडवली संस्था’(कंपनी) या व्यवसाय संघटनेचा उदय झाला. समाजाला मूलभूत स्वरूपाच्या सेवा देण्यासाठी सहकारी तत्वावर कार्य करणाऱ्या ‘सहकारी संस्थांचा’ उगम झाला

व्यवसाय संघटना म्हणजे काय ?

“जेंव्हा एखादी व्यक्ति व्यवसायात स्वत:चे भांडवल गुंतविते व व्यवसाय स्वत:च्या जबाबदारीवर चालविते, व्यवसायातील नफ्या-तोटयाला स्वत:च जबाबदार राहतेतेंव्हा त्यास ‘एकल व्यापारी’ किंवा ‘व्यक्तिगत व्यापारी’ असे म्हणतात”. – जेम्स लुंडी 

 “व्यापारात एकच व्यक्ति व्यवसायाला भांडवल पुरवठा करून,व्यवसायाचे व्यवस्थापन व नियंत्रण करते, आणि नफा-नुकसानीस स्वत: जबाबदार असते त्यास ‘एकल किंवा व्यक्तिगत’ व्यापारी असे म्हणतात.” – डॉ. जॉन शुबीनव्यवसाय संघटना प्रकार (business organization type)

  • विविध व्यवसाय संघटनांचे प्रकार पुढील प्र­माणे · 
  • एकल व्यापारी / व्यक्तिगत व्यापारी संस्था · 
जेंव्हा एखादी व्यक्ति स्वत:चे भांडवल व्यवसायात गुंतविते व व्यवसायाचे दैनंदिन व्यवस्थापन आणि नियंत्रण स्वत: करते, झालेल्या नफ्या-तोट्यास स्वत: जबाबदार असते, तेंव्हा त्यास ‘व्यक्तिगत व्यापारी / एकल व्यापारी’ असे म्हणतात. व्यवसायातील धोके स्वीकारून नफा मिळविते,कोणत्याही कायदेशीर बाबींची पूर्तता न करता व्यक्ति ताबडतोब व्यवसाय सुरू करू शकते.मात्र व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक परवान्याची गरज असते. 
  • भागीदारी संस्था · 
व्यक्तिगत व्यापारी व्यवसायातील सर्व व्यावसायिक कार्ये एकच व्यक्ति स्वत: हाताळू शकत नाही, कारण त्याच्याकडे भांडवल आणि व्यवस्थापकीय कौशल्ये ही मर्यादित असतात. व्यक्तिगत व्यापारातील दोष दूर करून व्यक्तिगत व्यापार विकसित करण्यासाठी व्यवसाय संघटनेचे नवीन स्वरूप उदयास आले. व्यवसायाचे विस्तारीकरण करण्यासाठी अधिक प्रमाणात भांडवल व व्यवस्थापकीय कौशल्य गरजेचे असते. म्हणूनच दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यक्ति एकत्र येऊन भागीदारी संस्थेची स्थापना करतात. 
  • संयुक्त भांडवली संस्था .
संयुक्त कंपनी  कायदा २०१३ प्रमाणे स्थापन झालेली संस्था म्हणजे संयुक्त भांडवली संस्था होय. कंपनीच्या कमाल सभासद संख्येवर मर्यादा नाही. भांडवलाचे विभाजन भागांमध्ये करून संयुक्त भांडवली संस्था प्रचंड प्रमाणावर भांडवल उभारणी करून व्यवसाय करतात. समान हेतू असलेल्या व्यक्तिंची स्वतंत्र अस्तित्व असलेली संघटना म्हणजे ‘संयुक्त भांडवली संस्था’ (कंपनी ) होय.  
  • सहकारी संस्था .
स्वत:च्या आर्थिक प्रगतीसाठी
स्वेच्छेने आणि समानतेच्या तत्वावर
आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तिंनी स्थापन
केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था
होय.

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

एक टिप्पणी भेजें

और नया पुराने