पतनिर्मिती (husbandry) म्हणजे काय ? बँकेच्या पतनिर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करा.

0

पतनिर्मिती (husbandry) म्हणजे काय ? बँकेच्या पतनिर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करा.

पतनिर्मिती (husbandry) म्हणजे काय ? बँकेच्या पतनिर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करा.

प्राथमिक ठेवींच्या साहाय्याने कृत्रिम व्युत्पन्न ठेवी निर्माण करण्याच्या प्रक्रियेला 'पतनिर्मिती' असे म्हणतात.

बँका दोन प्रकारची पतनिर्मिती करतात. एक म्हणजे ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींमधून ग्राहकांना कर्जे देणे व दुसरे म्हणजे दिलेल्या कर्जामधून नवीन ठेवी निर्माण करणे व त्यातून कर्जव्यवहाराचा विस्तार करणे. हर्टल विदर्स यांनी या संदर्भात असे म्हटलेले आहे की, "प्रत्येक कर्ज एक नवीन ठेव निर्माण करते. "

(क) जेव्हा ठेवीदार रोख स्वरूपात आपल्या बँकखात्यात ठेवी जमा करतात तेव्हा त्या ठेवींना 'प्राथमिक ठेवी' किंवा 'रोख ठेवी' म्हणतात. अशा ठेवींवर बँका ठेवीदारांना व्याज देतात.

(ख) पतनिर्मिती करण्यासाठी रोख ठेवींपेक्षा निर्मित ठेवी महत्त्वाच्या असतात. बँकांनी दिलेल्या कर्जातून ज्या नवीन ठेवी निर्माण होतात त्या ठेवींना 'निर्मित ठेवी' असे म्हणतात.
बँकांजवळील रोख पैसा जमा करून ग्राहक जे खाते उघडतो ते खाते म्हणजे बँकेची प्राथमिक ठेय असते. या ठेवीतील अगदी अल्प भाग त्या खातेदाराच्या गरजा भागविण्यासाठी बैंक बाजूला ठेवते व उरलेल्या पैशाचा विनियोग इतर ग्राहकांना पैसे कर्जाऊ देण्यासाठी करते. या कर्जवाटपातून बँक नव्या ठेवी निर्माण करते. या ठेवींनाच आपण दुय्यम ठेवी' म्हणतो. म्हणजेच एक कर्ज देण्यातून अनेक नव्या ठेवी निर्माण होतात, त्यामधून पतपैसा निर्माण होतो. हा मुद्दा एखाद्या उदाहरणाच्या •साहाय्याने जास्त चांगला समजावून घेता येईल.

प्राथमिक ठेवीदार आपली सर्वच्या सर्व ठेव परत काढून घेणार नाही या विश्वासावर बँका हा कर्ज देण्याचा व्यवहार करीत असतात. प्राथमिक ठेवीदाराला जेव्हा काही गरज पडते तेव्हा त्याच्या गरजेपुरते पैसे तो बँकेतून काढतो. तेवढे पैसे बँक रोख स्वरूपात नेहमीच ठेवते.

उदाहरणार्थ, एका व्यक्तीने बँकेत 1,000 रुपयांची रोख रक्कम ठेवलेली असेल तर ती व्यक्ती लगेचच ती रक्कम पुन्हा काढून घेत नाही. तिच्या गरजेसाठी ₹ 100 रोख स्वरूपात शिल्लक ठेवणे पुरेसे असते. उरलेले ₹900 बैंक इतर कर्जदारांना कर्जे देण्यासाठी किंवा, नवीन दुय्यम ठेवी निर्माण करण्यासाठी उपयोगात आणू शकेल. पहिल्या खातेदाराच्या ठेवीतील ₹900 बैंक दुसऱ्या ग्राहकाला कर्जाऊ देते, म्हणजे त्या खातेदाराच्या नावाने एक खाते उघडते व त्या खात्यावर ती रक्कम जमा करते.

प्रत्यक्षात पैसे देण्या-घेण्याचा व्यवहार केला जात नाही. कर्ज देण्याची प्रक्रिया पुढे गुणित पद्धतीने चालू राहते. ज्या व्यक्तीला बँकेने कर्ज मंजूर केलेले आहे ती व्यक्ती दुसन्या व्यक्तीला रोख पैसे देत नाही, त्या व्यक्तीला चेक देते. ज्या व्यक्तीला चेकने पैसे मिळतात ती व्यक्ती जर चेक घेऊन त्याच बँकेत आली तर बँक त्या व्यक्तीला रोख पैसे देत नाही. त्या व्यक्तीच्या खात्यावर ते पैसे जमा करते. दुसऱ्या बँकेकडे ती व्यक्ती तो चेक घेऊन गेली तर ती बँक त्या व्यक्तीचा चेक स्वीकारेल व दोन्ही बँका आपले व्यवहार आपापसात मिटवतील, चेक मिळालेल्या व्यक्तीलाही सर्व रक्कम काढण्याची गरज पडत नसल्याने हा व्यवहार अशा रीतीने चालत राहतो. ₹1,000 ठेवीतील ₹100 रोखता शिल्लक ठेवून ₹900 रुपयांच्या आधारावर बैंक अशा रीतीने ₹9,000 कर्ज देऊ शकते व किमान 9 नव्या ठेवी निर्माण करू शकते. ही सर्व पतनिर्मितीची किमया आहे. अशा रीतीने प्रत्येक कर्ज नव्या ठेवी निर्माण करते हे विधान सत्य असल्याचे सिद्ध होते.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)